नंदूरबार l प्रतिनिधी
एक से बढकर एक घोडा पाहण्याचा आनंद अश्वप्रेमीना पाहण्यास मिळाले . प्रत्येकांची किमंती कोटी वर …सुरु होती अश्व सौदर्य स्पर्धा या स्पधेत महाराष्ट्रातील काजिम व पंजाब चा अल्बक्ष यांच्यात प्रथम विभागुन देण्यात आला .
चेतक फेस्टीव्हल मार्फत गेल्या चार दिवसांपासून विविध अश्वांचा विविध प्रकारातील अश्वसौदर्य स्पर्धा झाल्या आज मारवाड प्रजातीचे अश्वाची स्पर्धा झाली . त्यात लुदीयाना ( पंजाब ) येथील आर.पी. गील यांचा अल्बक्ष , व अहमदनगर ( महाराष्ट्र ) येथील आजिझ अबेदी यांचा काजिम यांना प्रथम विभागून देण्यात आला. त्यांचा गौरव करण्यात आला द्वितीय अहमदाबाद येथील मोहम्मद रफीक यांचा अलमस्थान , तृतीय अहमदनगर येथील राज सातपुते यांचा प्रधान , चौथा अहमदनगर येथील राज सातपुते यांचा परझन , पाचवा नाशिक येथील सध्यद अश्यद याचा बुलंद या अश्वांचा सन्मान करण्यात आला .
मारवाड घोडीच्या सौदर्य स्पर्धत प्रथम क्रमांक दमन चे विवेकभाई यांची मोरनी , द्वितीय हरियाना चे आशिष नांदल यांची समवाद , तृती पुणे येथील बबलु शेख मोरनी , इंदौर येथील लोकेश सिंग व्हिकटोरीया , अहमदाबाद येथील रिजवान पटेल यांची हिना . यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी. चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , गजेंद्पालसिंग ओसणे , जयेश पेखडे , आर .पी. गील , महानंदाचे अध्यक्ष रणजीतसिंग देशमुख , संदिप निर्मल पाटील, प्रणवराजसिंह रावल आदी उपस्थित होते .
महाराष्ट्रातील काजिम व पंजाब चा अल्बक्ष या
दोघी घोड्यांचे गुण सारखे असल्यामुळे दोघांना विनर घोषित करण्यात आल्या.