नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कै.गणेश शंकर माळी यांच्या १० व्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा परिसर श्रीराम चौक येथे खैरनार परिवारातर्फे कोविड लसिकरण व कोविन पासचे मोफत वाटप करण्यात आले. या शिबीरात ५० नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले तर सुमारे ४५० जणांना कोविन पासचे वाटप करण्यात आले.
कोविन पास वाटप कार्यक्रमास जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम चंद्रकांत रधुवंशी उपस्थित होते. याप्रसंगी जगन माळी हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्व.गणेश शंकर माळी यांनी आपले जीवन समाजकार्यात झोकुन देऊन निरंतर सहयोगाने झटणारा, धार्मिक प्रसंगी सतत राबण्याची क्षमता असलेले अशी त्यांची ओळख होती, त्यांनी सरकारी दवाखान्यात कार्यरत असतांना गोरगरिबांची सुखःदुखात मदत केली. कोविड लसीकरण व कोविन पास वितरण सारखा सामाजिक कार्यक्रम घेवून त्यांना श्रद्धांजली वाहणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. कार्यक्रमास देवरे सर, निंबा माळी, छोटुभाऊ माळी, भिका माळी, बापु गुरव, जयेश माळी, योगेश माळी, आबा गुरव, कैलास माळी, पप्पु माळी आदी उपस्थित होते.








