नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.८ दिवसानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळले आहेत.सध्या जिल्ह्यात ४ रुग्ण आहेत.
आज नंदुरबार प्रशासनातर्फे ५४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.यात जिल्ह्यातील दोन जण कोरोना बाधित आढळले आहेत.त्यात नंदूरबार शहरातील अरिहंत नगर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.तर तळोदा येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार तालुक्यात २, नवापूर १, तळोदा तालुक्यात १ असे जिल्ह्यात ४ रुग्ण आहेत. नंदूरबार जिल्हयात आतापर्यंत ३७ हजार ५६९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ९५१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ हजार ६१६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








