नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत श्रीरामपुर ता. नंदुरबार येथे नवापूरचे गट विकास अधिकारी सी . के .माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भेट देऊन ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२०- २०२१ अंतर्गत उकृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची तालुकांतर्गत समिती मार्फत तपासणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर पंचायत समिती च्या समितीने श्रीरामपूर येथे भेट दिली. यावेळी समितीत ‘ गट विकास अधिकारी चंद्रकांत माळी , सहाय्यक गट विकास अधिकारी मानसिंग वळवी विस्तार अधिकारी संजय पाटील यांचा समोवश होता. यावेळी समितीने ग्राम पंचायती मार्फत उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शुद्ध पाणी वॉटर फिल्टर प्लान , फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या जिल्हयातील पहिला प्रयोग सखी प्रेरणा भवन (डिग्निटी रूम) , सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प , जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॅण्ड वॉश स्टेशन , श्रमदानातून केलेल्या वृक्ष लागवड व इतर विकास कामांची पाहणी केली . योवळी सरपंच विमलबाई गांगुर्डे, उपसरपंच शांताराम गावीत, माजी सरपंच शत्रूघन गांगुर्डे , ग्रामसेविका रूपाली देवरे , गट समन्वयक प्रितेश पाटील ‘ ,शकुंतलाबाई गायकवाड, योगिता गायकवाड, किरण ठाकरे , रुस्तम गायकवाड जिल्हा परिषद शिक्षक सोनवणे , गरदरे , कुलकर्णीअंगणवाडी सेविका, आशाताई, शिपाई, रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, फिनिश सोसायटीचे राकेश गुरव तसेच निगराणी सदस्य उपस्थित होते.








