नंदूरबार l प्रतिनिधी
सारंगखेडा येथील अश्व बाजारात नुकरा सौदर्य स्पर्धाची रंगात पहायला मिळाली . कोट्यवधी रुपये किमंत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत नुकरा प्रकारातील सौदर्य स्पर्धा चार वेगवेगळ्या गटात झाली .या स्पर्धेत ११० घोडयांनी सहभाग घेतला होता .

महिला आणि पुरुषांच्या जशा सौदर्य स्पर्धा होतात . तशाच घोड्यांच्याही होत असतात . येथे होत असलेल्या अश्व सौदर्य स्पधेत देशभरातील नामवंत अश्व शौकिनांनी आपले अश्व या स्पर्धत सहभाग नोंदविला होता . यात चाल , रंग , रुबाब , त्यांची ठेवण , दात , उंची , मान , डोळे , कान एकदंत , अदंत , चार दंत आणि स्वभाव यातुन हे या स्पर्धत परिक्षकांनी निकष लावले जातात . कोटयांवधी रुपये किमंत असलेले अश्व येथे पहायला मिळत आहेत . जिल्हाधिकारी मनिषा खंत्री या वेळी उपस्थित होते . यावेळी विभागीय अधिकारी डॉ . चेतन गिरासे , चेतक फेस्टीव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल , तहसीलदार डॉ . मिलिंद कुळकर्णी , पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ , पोलीस निरिक्षक श्री .पठाण , कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव संजय चौधरी , सरपंच पृथ्वीराज रावल , प्रणवराज रावल आदी उपस्थित होते .
विजेते पुढील प्रमाणे .
प्रथम क्रमांक किंग अश्व मालक भगतसिंग यांचा अश्व , द्वितीय क्रमांक जुगणु अश्व मालक रंजितसिंग कृपाली, तृतीय क्रमांक बेनहूर अश्व , मलिक प्रकाश वर्मा, यावेळी परिक्षक म्हणून विकास बोयतकर , सिंग , सुजिदर सिध्द् आदींनी काम पाहिले.रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरु होत्या .








