Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत शिरोमणी विद्यासागरजी यांचे टपाल पाकिट समाजासाठी प्रेरणादायी : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

team by team
December 24, 2021
in सामाजिक
0
संत शिरोमणी विद्यासागरजी यांचे टपाल पाकिट समाजासाठी प्रेरणादायी : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
सशक्त समाज निर्मितीसाठी सकारात्मक विचारांची गरज असते. महाकवी जगद्गुरु संत शिरोमणी दिगंबराचार्य विद्यासागरजी महाराज यांचे टपाल पाकिट सामाजिक उत्थानासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पूर्वीप्रमाणेच पत्र लेखन करून टपाल पाकिटांचा उपयोग व्हावा तसेच सामाजिक संदेशासाठी दिगंबर जैन समाजाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले.
शहरातील दीनदयाल चौकात असलेल्या मुख्य टपाल कार्यालयाबाहेर विद्यासागरजी महाराज यांच्या संस्कृती शासनाचार्य 2021 – 22 सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित टपाल पाकिट अनावरण प्रसंगी जिल्हाधिकारी मनिषा खत्री बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे विभागीय डाक अधिक्षक प्रताप सोनवणे होते. व्यासपीठावर दिगंबर जैन समाजाचे प्रतिनिधी पवन झांझरी उपस्थित होते.याप्रसंगी संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. माणिक चौकातील दिगंबर जैन समाजाचे मंदिर आणि परमपूज्य महाकवी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या छायाचित्र असलेल्या पाकिटाचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी मनिषा खत्री पुढे म्हणाल्या की, नंदुरबार शहरात दिगंबर जैन समाजांनी वेळोवेळी सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. आजच्या धावपळीच्या युगात देखील टपाल पाकिटाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिगंबर जैन समाजाने पुढाकार घेतला ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या माध्यमातून त्यागमूर्ती संतांचे विचार समाजासाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरतील असेही मनिषा खत्री यांनी सांगितले. प्रवर डाक अधीक्षक प्रताप सोनवणे यांनी शासनाच्या टपाल विभागातर्फे विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले. संतशिरोमणी विद्यासागरजी महाराज यांच्या कार्याची माहिती सरिता झांझरी यांनी दिली. मंगलाचरण विजय अजमेरा यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुरेश जैन यांनी या विशेष टपाल पाकिटा संदर्भात माहिती दिली. टपाल पाकिटाचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन समस्त दिगंबर जैन समाजातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या चाळीस वर्षात जिल्ह्यातील या पहिल्या उपक्रमासाठी झुथालाल अमरचंद जैन सुपर शॉप आणि परिवारातर्फे विशेष सहकार्य लाभले. डाक विभागाचे अधिकारी आहुती रंजन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार दिगंबर जैन समाज आणि नंदुरबार टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजातर्फे टपाल विभागाच्या माध्यमातून संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांच्या पाकिटाचे अनावरण करताना जिल्हाधिकारी मनीषा खत्री सोबत धुळे डाक अधीक्षक प्रताप सोनवणे, पवन जैन, सुरेश जैन, महेंद्र जैन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

सुनंदा भावसार यांची कविता सातासमुद्रापार

Next Post

सारंगखेडा येथे नुकरा सौदर्य स्पर्धेत ११० घोड्यांचा सहभाग

Next Post
सारंगखेडा येथे नुकरा सौदर्य स्पर्धेत ११० घोड्यांचा सहभाग

सारंगखेडा येथे नुकरा सौदर्य स्पर्धेत ११० घोड्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add