नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कवयत्री सुनंदा सुहास भावसार यांच्या कवितांचा समावेश असलेल्या आशिया खंडातील १२ देशातील कवी_कवयित्रींच्या कविता सातासमुद्रापार जाणार आहे.
बदलत्या काळानुसार मराठी कविता कशा बदलल्यात आणि कवितांचे विषय कसे बदलत गेले याचे संशोधन करण्यासाठी, आणि मराठी भाषेचे राजस रुप दर्शविण्यासाठी निवडलेल्या कविता आशिया खंडातील १२ देशांमध्ये भाषांतरीत करुन पाठविण्याचे कार्य डाॅ. साहेबराव खंदारे यांनी एशियन पोएट्रीच्या माध्यमातुन हाती घेतले आहे.
निवडलेल्या कविता इंग्रजीत भाषांतर करुन पुस्तकरुपाने प्रकाशित होणार आहेत.यासाठी विशेष प्रकारच्या कवितांची निवड केलेली आहे,त्यात नंदुरबारच्या सौ. सुनंदा सुहास भावसार,( पुर्वाश्रमीच्या कु. सुनंदा उत्तमराव भागवत ,पुसद.) यांच्या थेंब आज हा पाण्याचा आणि दुखवटा ह्या पर्यावरणावरील दोन कवितांचाही समावेश आहे.
‘थेंब आज हा पाण्याचा’ ही कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमासाठी मराठी बालभारती या पुस्तकात समाविष्ट केली आहे तर दुखवटा ‘ ही कविता त्यांच्या पर्यावरण गीत गंगा ह्या पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रहातून निवडली आहे. .काव्यलेखनाचा वारसा त्यांना त्यांच्या मातोश्री शकुंतला भागवत ह्यांचाकडून लाभला आहे. सुनंदा भावसार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.