नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील काकडदा येथे वनपाल म्हणुन कार्यरत असलेल्या संतोष इंदवे यांचा नौकरी वरून परतांना रस्त्यातच हृदविकाराच्या झटका आल्याने उपचारा आधिच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,धडगांव तालुक्यातील काकडदा येथे वनपाल म्हणून नेमणुकीला असलेले संतोष इंदवे (४५) हे त्यांच्या इडींगा गाडी ने (क्र.एम.एच.३९-एजी-५८२२) दररोज शहादा ते काकडदा ये-जा असतात. धडगांव तालुक्यातील काकडदा येथुन डयुटी संपल्यानंतर संतोष इंदवे यांच्या गाडीत वनरक्षक निलेश सुरेश अहिरे काकडदा येथुन शहादाकडे जाण्यास निघाले असता, काकडदा फाटयाजवळ गाडी आली असता, संतोष इंदवे यांचे छातीमध्ये अचानक दुखू लागले व ते बेशुध्द झाले.त्यामुळे त्यांना वनरक्षक निलेश सुरेश अहिरे,सिध्दार्थ गोरख बैसाणे यांनी म्हसावद येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी सिध्दार्थ गोरख बैसाणे रा.गोविंदनगर,दोंडाईचा ता.शिंदखेडा यांच्या खबरी वरून म्हसावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत वनरक्षक सिध्दार्थ गोरख बैसाणे यांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी अभिजीत पिंगळे व मयत संतोष इंदवे यांच्या वडीलांना फोनद्वारे माहिती दिली.