नंदुरबार | प्रतिनिधी
पेट्रोल सारख्या ज्वलंतशील पदार्थ बाळगून हयगयीचे वर्तन केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विविध अवैध व्यवसायांसह अवैध कामांवर धाडी टाकण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलीस दलाने पेट्रोल सारख्या ज्वलाग्रही पदार्थ बाबत हयगयीचे वर्तन करून मानवी जिवीतास धोका निर्माण होईल. अशा पध्दतीने आढळल्याने १४ जणांविरूध्द कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये पेट्रोल सर्रासपणे अस्वाचा सव्वा दराने विक्री होत आहे. याबाबत अनेकजण आपल्या दुकानात किंवा घरात अवैध पेट्रोलचा साठा करीत आहे. अशा लोकांविरूध्द पोलीसांनी कारवाईचा बडगा उचलला त्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. यामध्ये अजयबसिंग जगन्नाथ नाईक रा.बर्डीपाडा खांडबारा(ता.नवापूर), इंद्रसिंग नारायण नाईक रा.बर्डीपाडा खांडबारा(ता.नवापूर), वासु बागु गावीत, सोन्या देवजी गावीत दोन्ही रा.बेडकी (ता.नवापूर), नारायण जादू पाडवी रा.जुना रोझवा (ता.तळोदा), आनंदा सुखलाल कोळी रा.शेल्टी (ता.शहादा), राजेश कांतीलाल गावीत रा.प्रतापपूर रायपुर (ता.नवापूर), भिमा रेवा गावीत रा.वळकळंबी (ता.नवापूर), सुनिल विजयसिंग तडवी रा.उदयपूर (ता.अक्कलकुवा), राजकुमार चंद्रसिंग नाईक कोठली खुर्दे (ता.नंदुरबार), जयसिंग साकर्या चौधरी रा.ढेकवद (ता.नंदुरबार), दिलीप भटा पाटील रा.भालेर (ता.नंदुरबार), निलेश संजय पाटील रा.बलवंड (ता.नंदुरबार), किसन माकत्या पाडवी रा.धनाजे बुद्रूक तलावडीपाडा (ता.धडगांव) यांच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही रस्त्यावर अवैध पेट्रोल विक्री करणार्यांविरूध्द पोलीस दलातर्फे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.








