Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात नऊ व अक्कलकुवा येथे एका व्यावसायिकाकडे धाडीने बडे व्यावसायिक हादरले

team by team
December 22, 2021
in क्राईम
0
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील 9 व्यापारी व अक्कलकुवा येथील एका व्यक्तीं व त्यांच्या आस्थापनांमध्ये आज सकाळी नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या पथकांची धाडी टाकल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. सकाळपासून आतापर्यंत पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.अद्याप त्याला पुष्टी मिळालेली नाही .
आज सकाळीच नंदुरबार शहरातील ९ नामांकित व्यक्तींकडे व त्यांच्या आस्थापनांमध्ये तपासणी सुरू असल्याचे आढळून आले . नाशिक आणि औरंगाबाद येथील आयकर विभागाच्या
अधिकाऱ्यांचे पथक अशा तऱ्हेने धडकलेले पाहून अनेकांचे धाबे दणाणले . पसरलेल्या या वार्तेमुळे नंदुरबार मधील बडे व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत . सध्या आयकर विभागाने उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , कर्नाटक असे क्रमाने विविध राज्यात छापेमारी करीत अब्जावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता हुडकून काढणे चालू ठेवले आहे . मागील दोन महिन्यात अवैध व्यवहार , बेकायदेशीर खरेदी – विक्री , बनावट कर्ज प्रकरणे , बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या विवध ट्रस्टच्या माध्यमातून घोटाळे याच्याशी संबंधित व्यवहार उघड केले जात आहेत . केंद्रीय पथकांनी सुरू ठेवलेल्या या मोहिमेचा देशस्तरावरील काही बड्या ग्रुपला तसेच बड्या नेत्यांना फटका बसला . अशातच महाराष्ट्रातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याकडे या पथकांनी अचानक वक्री नजर वळवल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे . अर्थात हे पथक केंद्रातील आहे की राज्य स्तरावरील आहे याची स्पष्टता अधिकृतपणे झालेली नाही . परंतु कागदपत्रांची नोंदींची व दप्तराची झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे .नंदूरबार शहरातील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या एका व्यावसायिकाची व त्याच्या व्यवसायाशी संबंधित अशा ८ जणांकडे तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.नंदूरबार सह अक्कलकुवा येथेही एका व्यापाऱ्यांकडे कागदपत्रांची तपासणी असल्याचे सांगण्यात येत आहे.वय धाडीमुळे नंदुरबार चांगलेच हादरले आहे . वेगवेगळ्या पथकांनी अचानक नंदुरबार शहरातील काही व्यापाऱ्यांकडे छापेमारी करून झाडाझडती घेणे सुरू केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जाते . तथापि पथकांविषयीची अधिकृत माहिती कोणत्याही स्तरावरून देण्यात आलेले नाही . अथवा त्याला पुष्टी मिळालेली नाही .

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यापीठाचां स्वायतेवर घाला घालणारे निर्णय तत्काळ रद्द करा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी

Next Post

गुन्हेगारी टोळीतील १६ इसम २ वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

गुन्हेगारी टोळीतील १६ इसम २ वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add