नंदूरबार l प्रतिनिधी
उमर्दे खुर्दे ता. नंदुरबार येथील दत्त मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त मंदिराचे पुजारी भागवताचार्य श्यामचंद्र मुळे यांनी श्रीगुरुचरित्र पारायण केले.
उमर्दे खुर्दे ता. नंदुरबार येथील दत्त धाम येथे श्री गुरूदत्त पारायण समाप्ती प्रसंगी श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव व भंडाऱ्याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते.येथे २५-१२-१९८७ रोजी श्री. गुरुदत्त महराजांची स्थापना करण्यात आली.येथील भवानी मातेचे पुजारी प्रेमचंद भागवत मुळे यांनी महूराणीपूर येथील पंचअग्नि आखाड्याचे ब्रह्मलीन महंत जोगेश्वरनंदजी यांच्या आदेशाने २५ सप्टेंबर १९८५ रोजी श्री.गुरुचरित्र पारायण सुरुवात केली. येथे १०८ गुरू श्री गुरुदत्त चरित्र पारायण केले, त्यानंतर ब्रह्मलीन जोगेश्वरानंदजी यांच्या हस्ते दत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून येथे अखंडपणे दत्त पारायण सुरू आहे. मंदिराचे पुजारी भागवताचार्य श्री.श्याम चंद्र प्रेमचंद मुळे यांनी गुरुचरित्र पारायण केले दत्त जयंतीच्या दिवशी दुपारी दत्त जन्मोत्सव साजरा साजरा करण्यात आला. ग्रामस्थांतर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.








