Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा, खापर ,कोराई नवापाडा येथील अवैध धंदे बंद करा : क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेची मागणी

team by team
December 21, 2021
in क्राईम
0
अक्कलकुवा, खापर ,कोराई  नवापाडा येथील अवैध धंदे बंद करा : क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा, खापर ,कोराई नवापाडा येथील अवैध धंदे बंद करण्याची मागणीचे निवेदन क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेतर्फे नायब तहसीलदार गागुर्डे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले कि,
अक्कलकुवा खापर परिसरात अवैध व्यवसायाने धुमाकुळ घातला आहे. ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींसाठी जाळे पसरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारी यामुळे खापर,कोराई,नवापाडा परिसर आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा ओढा वाढत आहे. परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार,गांजा, मुरुम, बेकायदा दारुविक्री, वाळू तस्करी, अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण गुरफटले आहेत. दररोज लाखो रुपयांचा मटका खेळुन काहींजण आयुष्यातुन उठले आहेत. तर काहीजण कर्ज काढुन मटका खेळत आहेत.
खापर व अक्कलकुवा मध्ये ८ ते १० मटका बुकी चालत आहेत आणि तेही ऑनलाइन मोबाईल वरती मटका अंक घेत आहेत मटका बुकी चालकाकडून तसेच गुटका विक्रेते पोलीस प्रशासनासोबत मोठ्या प्रमाणात अथपुर्ण संबंध ठेऊन राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरत असल्याने अशा अवैध धंदे करणाऱ्या कडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली जात असल्याने त्यांच्या विरोधात कोणी धाडस करुन तक्रारही करु शकत नाही.
पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैद्य धंदे खुलेआम चालू करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. खेड्यापाड्यातुन अनेकजण कामाला जातो म्हणुन सांगुन येथे दिवसभर मटका जुगार खेळत असतात. त्यांचे संसार उध्वस्त होऊ लागलेत. परिणामी त्रस्त कुटुंबिय व संतप्त नागरीक पोलिसांवर तोंडसुख घेत आहेत. अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती असताना अर्थपुर्ण संबंधामुळे व राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे चित्र आहे. अवैध व्यावसायांना जास्त विरोध झाल्यास मोठ्या माशांना वाचवण्यासाठी मग किरकोळ व लहान माशांवर कार्यवाहीचा फार्स करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम पोलिस करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे.
दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असतानाही पोलीसांच्या आशिर्वादाने खुलेआम गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहेत. मटका व गुटख्याचा धंदा येथे जोमात सुरू असुन बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक सलोखा बिघडत आहे.
वरिष्ठ पोलीसांनी अक्कलकुवा खापर परिसरातील अशा सर्वच बेकायदा व्यवसाय, काळ्या धंद्यांची पाळेमुळे खणुन काढावीत. करडी नजर ठेवुन कायद्याचा धाक निर्माण करावा. लोकांचे उध्वस्त होणार संसार वाचवावेत अशी मागणी अक्कलकुवा, खापर व परिसरातील नागरिक करीत आहेत. कोणता पोलीस अधिकारी व कर्मचारी रेर्कार्डवर असलेल्या कोणत्या अवैध व्यावसायीकांबरोबर अर्थपुर्ण हितसंबंध जोपासत आहे.अक्कलकुवा पोलीसांचे अवैध व्यावसायीकांबरोबर असलेले अर्थपुर्ण हीतसंबंध शोधण्यासठी नंदुरबार पोलीस आधिक्षक यांनी सायबर वरुन त्यांचे गेल्या सहा महिन्याचे मोबाईल कॉल डिटेल व पोलीस ठाण्यातचे सिसिटीव्ही फुटेज तपासावेत अशी मागणी जनतेतुन केली जात आहे. तसे न झाल्यास क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेच्या वतीने दि. २८ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील अंकलेश्वर – ब्राहाणपूर हायवे खापर येथे कोराई चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबधित विभागास जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदन देताना क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय तडवी,जिल्हा सचिव विनोद वसावे ,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष शब्बीर मक्राणी ,जिल्हा युवाध्यक्ष अफजल मक्राणी ,अर्जुन पाडवी ,अमजत पठाण, रविदास तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे वनदावे व वनपटटेधारक, शेतकरी यांच्या मागण्यासाठी आ. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात प्रांताधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

Next Post

उमर्दे खुर्दे येथे दत्त मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव साजरा

Next Post
उमर्दे खुर्दे येथे दत्त मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव साजरा

उमर्दे खुर्दे येथे दत्त मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add