नंदुरबार l प्रतिनिधी :-
नंदुरबारहुन उधनाकडे जाणाऱ्या पैसेंजर रेल्वेच्या प्रवासादरम्यान दरवाज्यात बसण्याच्या वादातून एक जण रेल्वेतून कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.याप्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार ते उधना पॅसेंजर रेल्वेत (क्र. 09378) खातगाव-चिंचपाडा स्थानकादरम्यान दोन व्यक्तींमध्ये रेल्वेच्या दरवाज्यात बसण्याच्या वादातून फरहाज कुरेशी हाजी मोबीन व संदीप गणेश वळवी यांच्यात हाणामारी झाली.या भांडणात फरहाज कुरेशी हाजी मोबीन ( वय 17) रा.कुरेशी मोहल्ला नंदुरबार गाडीतून फेकल्याने पुलावरून पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.प्रवाशांनी संदीप गणेश वळवी यास चिंचपाडा स्टेशन मास्तर कार्यालयात पकडुन ताब्यात दिले. सध्या तो विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे.घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तेथे दाखल झाले. विसरवाडी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह ताब्यात दिला.








