Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाला भेट, तळोदा येथे राजकीय चर्चेला आले उधाण

team by team
December 20, 2021
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाला भेट, तळोदा येथे राजकीय चर्चेला आले उधाण

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भेट देऊन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसींग पाडवी यांच्या भेट घेत सोबत चहा पान केले. दरम्यान या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना रघुवंशी यांनी सांगितले की, धडगाव निवडणुकांची प्रचारासाठी जात असल्याने सहज भेट दिली. राष्ट्रवादी हा आमचा मित्र व घटक पक्ष असल्याने भेट घेण्याचा आमचा अधिकार असल्याचे म्हणत त्यांनी विनोदी उत्तर पत्रकारांना दिले.
पालिकेच्या निवडणुकाना वर्ष भराच्या अवधी असला तरी शहरात राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून नुकतेच प्रदेश उपाध्यक्ष तथा मा आ.उदेसिग पाडवी यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या उद्घाटन सोहळाप्रसंगी श्री.पाडवी यांनी येणारी पालिका निवडणूक महाविकास आघाडी संघटितपणे लढविणार असल्याचे सूचक वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने राजकीय चर्चेला उधाण आले होते. रविवारी अचानक शिवसेनेचे चंद्रकांत रघुंवशी यांची झालेली भेट पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितरक लावले जात आहे.
दरम्यान याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत रघुंवशी यांनी सांगितले की, आगामी निवडणूक आम्ही सोबत लढू शकतो त्यात विशेष नाही आम्ही महाआघाडी मधिल घटक आहोत असे सूचक उत्तर दिले. या भेटीमुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत कोणता पक्ष कोणाशी युती व आघाडी करेल याची चर्चा मात्र आता पासून सुरू झाली आहे. परिणामी येत्या पालिका निवडणुकांमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला त्याठिकाणी कडवं आव्हान असल्याचे बोलले जात आहे. या भेटी प्रसंगी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश मराठे, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, कृ,ऊ, बा, समितीचे संचालक भरत चौधरी, कमलेश पाडवी, केशरसिंग क्षत्रिय गणेश पाडवी, राहुल पाडवी, फारुक मेमन, गणेश राणे, नदीम बागवान, योगेश पाडवी, यु.रा.काँ.तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी, आरिफ शेख, आदिल शेख,जितेंद्र केदार, मनोज खैरनार, इम्रान सिकलिकर, प्रकाश पाडवी, संजय वाणी, आदी उपस्थित होते

कार्यालयाची केली प्रशंसा
मा.आ. चद्रकांत रघुवंशी यांनी कार्यालयाची प्रशंसा केली. व संबधित कारगीरास नंदुरबार येथे बोलावून तेथे देखील असे कार्यालय तयार करण्याचे त्यांना सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

Next Post

आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतननुसार लाभ मिळावा खा. डॉ.हिना गावीत यांच्या कडे प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add