नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे गावातील एका १७ वर्षीय मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. याबाबत मुलीच्या आजोबांनी शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.










