तळोदा | प्रतिनिधी –
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षातर्फे शहादा-तळोदा मतदार संघातून २० हजार पोस्ट कार्ड प्रधानमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. या आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी १ कोटी पोष्टकार्ड देशाचे पंतप्रधान यांना पाठविण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या सूचनेवरून तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-तळोदा मतदार संघातून २० हजार पोस्टकार्ड पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी तळोदा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माहिती देताना श्री.पाडवी यांनी सांगितले की, मागील राज्य सरकारच्या चुकीच्या पद्धतीमुळे मराठा समाजाचे आरक्षण कोर्टाने फेटाळले आहे. मात्र, हे आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. यासाठी विशेषता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने अधिक कंबर कसली आहे. म्हणूनच प्रधान मंत्र्यांना एक कोटी पोस्ट कार्ड पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे कार्ड पोस्टाने रवाना करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक कार्यकर्ता संदीप परदेशी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार सनंसे, डॉ.रामराव आघाडे, भरत चौधरी, योगेश मराठे, कमलेश पाडवी,गणेश पाडवी, आदिल शेख, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, जयेश जोहरी, कांत्या पाडवी, महेंद्र पोटे, अरविंद वळवी, इमरान सिकलीकर, नदीम बागवान, प्रल्हाद फोके, मोहन मोठे, नवनीत शिंदे, शांताराम गायकवाड, विलास शिंदे, महेंद्र गाढे, ईश्वर पोटे, भास्कर मराठे, महेंद्र पोटे, अशोक मराठे, संजय बोराने, अनिल शिंदे उपस्थित होते.