Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

team by team
December 19, 2021
in राज्य
0
‘गोपालकृष्ण्’चा जयघोष करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी

गेल्या पाच दिवसांपासुन आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताहात नंदनगरीतील भक्तगण तल्लीन झाले. काल श्रीदत्त जयंतीची मुहूर्तमेढ व कथा सप्ताहातील श्रीकृष्ण जन्मोत्सव एकाच दिवशी असल्याने कथा सप्ताहात भाविकांचा मळा फुलला. ‘हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा’ व ‘राधे राधे’च्या जयघोषात सप्ताहातील श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या जन्मोत्सवानिमित्त भाविक श्रीकृष्णांच्या भक्तीत तल्लीन झाले.


नंदुरबार येथील नंददर्शन व चित्ते परिवाराच्या वतीने स्व. जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ 14 डिसेंबरपासून श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा सप्ताह सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून सप्ताहात कथेचे निरुपन करतांना भागवताचार्य, रामायणाचार्य तथा प्रसिद्ध ज्योतिषाचार्य प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे आपल्या संगीतमय अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेतील पौराणिक काळातील महनीय व्यक्तीमत्त्वांचे उपदेश देवुन जीवनाचे कल्याण करण्याचा उपदेश देत आहेत. जीवनातील श्रीमद् भागवत कथेचे महत्त्व भगरेगुरुजी कथेतून पटवून देत असल्याने कथा सप्ताहाला दररोज भाविकांचा मोठ्या उत्साहाने प्रतिसाद मिळत आहे. श्रीमद् भागवत कथा सप्ताहातील श्रीकृष्ण जन्मोत्सवाला विशेष धार्मिक व पारंपारिकतेचे महत्त्व आहे. या जन्मोत्सवातून भगवान श्रीकृष्णांची बालपणापासून असलेली नटखट लिला आणि वासुदेव-देवकी यांच्या जीवनकार्याची कथा प.पु.पं.भगरे गुरुजींनी सांगितली. यावेळी भक्ती संगीतात भाविक भक्तीमय झाले. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त महिला व पुरुष भाविकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. श्रीदत्त जयंती व कथा सप्ताहातील श्रीकृष्ण जन्मोत्सव एकाच दिवशी आल्याने श्रीकृष्णाच्या भक्तीत सारेच तल्लीन झाल्याने प.पु.पं.गुरुजींच्या संगीतमय अमृतवाणीतील भक्तीगितांवर अनेक भाविकांनी ठेका धरत ‘हरे राम, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा व राधे राधे’च्या नामस्मरणात नृत्यही केले. कथा सप्ताहात सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान राजेंद्र बन्सीलाल चौधरी यांनी वासुदेवाची वेषभुषा केली तर वंश मेहुल चौधरी या बालकाने बालश्रीकृष्णाची भुमिका साकारली. या नटखट बालकृष्णाने कथा सप्ताहातील भाविकांचे लक्ष वेधुन घेतल्याने सार्‍याचे बालश्रीकृष्णांच्या भक्तीत रमले. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. श्रीकृष्णाच्या नावाने मंडपात सुरेख रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. काल शनिवारी पाचव्या दिवशी गजेंद्रमोक्ष, श्रीराम चरित्र, परशुराम चरित्र, वामनावतार, समुद्रमंथन, श्रीकृष्ण, भागीरथ गंगावतरण जन्म यावर भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कथा सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफले. या कथा सप्ताहाचा समारोप दि.21 डिसेंबरला होणार असून भाविकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दै.नंददर्शन व चित्ते परिवाराच्या वतीने चेतनसिंग जुलालसिंग राजपूत, कोमलसिंग जुलालसिंग राजपूत, जितेंद्रसिंग  जुलालसिंग राजपूत, अभयसिंग जुलालसिंग राजपूत, दर्पण कोमलसिंग राजपूत, नीलय चेतनसिंग राजपुत, स्वामी कोमलसिंग राजपूत यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदास साडे पाच लाखांची कर्जमाफी देत दिला मदतीचा धनादेश

Next Post

मामाच्या जागेत विटभटटी लावण्याच्या कारणावरुन 29 वर्षीय युवकाचा दोघांनी केला खून,एकास अटक

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

मामाच्या जागेत विटभटटी लावण्याच्या कारणावरुन 29 वर्षीय युवकाचा दोघांनी केला खून,एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add