नंदुरबार | प्रतिनिधी
सारंगखेडा येथे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक करणार्या पिकअप वाहन पोलीसांनी जप्त केले असून सात जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सुमारे पावणेपाच तलाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहादा-सारंगखेडा रस्त्यावर अनदरबारी नाकाबंदी पॉईट येथे पिकअप गाड(क्र.एम.एच.३९-सी. ९८३०) ची सारंगखेडा पोलीसांनी तपासणी केली असता पिकअपमध्ये सात जनावरांना निदर्यतेने कोंबण्यात आले होते. बेकायदेशीरपणे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतुक केली जात होती. चार लाखाच्या पिकअप वाहनासह ७० हजाराची जनावरे हस्तगत करण्यात आली आहे. पोकॉ. प्रल्हाद राठोड यांच्या फिर्यादीवरून शेख शईद शेख शकील कुरेशी शेख् उस्मान शेख मुनेद कुरेशी दोन्ही रा. फत्तेपूर ता.शहादा यांच्याविरध्द सारंगखेडा पोलीस ठाण्यात प्राण्यांना कुरतेने वागणुक देण्यास प्रतिबंध अधिनियम ११ (घ), (ड), (च) सह प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सह मोटारवाहन कायदा कलम ७३/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ रोहिदास सोनवणे करीत आहेत. दोघाही संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.