Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यात १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी, २ हजार ६७६ प्रकरणात ग्राहकांना ७ कोटी ५३ लाखांची देण्यात आली बिले

team by team
December 16, 2021
in क्राईम
0
अक्कलकुव्यात साडेतीन लाख रुपयांची वीज चोरी उघड

नंदुरबार l प्रतिनिधी
जळगाव परिमंडलात गेल्या आठ महिन्यांत ५१०३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या ग्राहकांनी ५५ लाख ९ हजार ५७४ युनिटची ७ कोटी ५३ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. यात वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे सातत्याने मोहिमा राबविण्यात येत आहेत. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एप्रिल-२०२१ ते नोव्हेंबर -२०२१ या आठ महिन्यांत मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव जिल्ह्यात ३६८० प्रकरणांत ४१ लाख ५२ हजार ६१० युनिटची ५ कोटी ४२ लाख, धुळे जिल्ह्यात ८०३ प्रकरणांत ६ लाख ५९ हजार ७०७ युनिटची ९१ लाख तर नंदुरबार जिल्ह्यात ६२० प्रकरणांत ६ लाख ९७ हजार २५७ युनिटची १ कोटी २० लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या मोहिमांत निदर्शनास आली. एकूण ५१०३ प्रकरणांत विजेच्या अनधिकृत वापराची २०१ प्रकरणे उघडकीस आली. आकडा टाकून थेट वीज चोरल्याची २२२६ प्रकरणे तर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याची २६७६ प्रकरणे आहेत. या सर्व ग्राहकांना ७ कोटी ५३ लाख रुपये वीजचोरीची बिले देण्यात आली.
बिले न भरणाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे
दरम्यान, ५१०३ प्रकरणांपैकी केवळ १३९७ प्रकरणांमध्ये ग्राहकांनी वीजचोरीची बिले व तडजोड शुल्क भरले आहे. ज्या ग्राहकांना महावितरणने वीजचोरीची बिले दिली आहेत, त्यांनी ती तातडीने भरावीत. अन्यथा या ग्राहकांविरोधात थेट पोलिसांत गुन्हे नोंदवले जातील, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. गेल्या आठ महिन्यांत ३८ प्रकरणांमध्ये महावितरणने गुन्हे नोंदवले आहेत. वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे गावात झालेल्या खुन प्रकरणात तिनही आरोपीतांना सत्र न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

Next Post
तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

तळोदा येथे संजय गांधी योजना समितीच्या बैठकीत २२६ प्रकरणे मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add