नंदुरबार| प्रतिनिधी
शहरातील एका महिलेला साडी विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देवून दहा हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी सुरत येथील एकाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील जयभोलेनगर येथे राहणार्या आशाबाई प्रकाश पिंपळे यांना युटयुब ऍपलीकेशवर मातोश्री क्रियेशन या नावाने व्यवसाय करतो. असे भासवून आझाद जैन या युटयुब चॅनेलचे प्रसारीत करून साडया उत्पादन व होलसेल व साडी विक्रीचा व्यवसाय करतो. असे भासवून आशाबाई पिंपळे यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण करून साडया व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार रूपये भरण्यास सांगितले. आशाबाई पिंपळे यांनी फोनपेद्वारे १० हजार रूपये भरले. मात्र पैसे दिल्यानंतरही साडयांची घरपोच डिलेवरील न झाल्याने आशाबाई पिंपळे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात दिलीप राजपूत रा.बेसमेंट रेशनवाला मार्केट (सुरत) याच्या विरूध्द भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल कर ण्यात आला आहे. याप्रकरणी पोसई दवंगे करीत आहेत.