नंदुरबार | प्रतिनिधी
देशात न्युमोनियामुळे बालमृत्यू होतात हे बालमृत्यू रोखण्यासाठी देशभरातील बालकांना न्युमोकोकल लस देण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात दि.१२ जुलै पासून न्युमोकोकल लस टोचली जा णार असून त्यासाठी आरोगय विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
लहान बालकांना न्युमोकोकल न्युमोनियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. देशात दरवर्षी १ लाखापेक्षा अधिक बालकांचा मृत्यू न्युमोकोकला या आजारामुळे होतो. या आजारापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून न्युमोनियापासून बलाकांचे संरक्षण व्हावे, यासाठी न्युमोकाकेल लसीकरण राबवण्यात येणार आहे. राज्यात हे लसीकरण सुरू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात १२ जुलैपासून या लसीकरणाची सुरूवात होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान लहान बालकांच्या नियमीत लसीकरण कार्यक्रमासोबतच न्युमोकोकलचे लसीकरण होणार असल्याची माहि जिल्ह्यात विविध टप्यात हे लसीकरण केले जाणार असून यासाठी पथकांची नियुक्ती होणार आहे. न्प्युमोकोकल न्युमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुफ्फुसांवर सूज येवून त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होवू शकतो. बालकांना याचा धोका संभवतो.
बालकांना न्युमोकोकल लसीचे तीन डोस दिले जाणार आहे. बालक सहा आठवडयाचे झाल्यानंतर पहिला डोस दिला जाईल. १४ आठवडयाचे झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे तर ९ महिन्यांचे झाल्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे.