नवापूर l प्रतिनिधी
गुजरात राज्यातून नवापूरमार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा नवापुर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत पकडला असून आठ लाख 59 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन व्यक्तींवर नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात नवापूर मार्गे राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याची वाहतूक (एम.एच.04, बी.एन. 2923) गाडीने होत असल्याच्या माहितीवरून नवापुर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीच्या वेळेस नवापूर शहरातील धडधडया रेल्वेगेट जवळ गुजरात राज्यातून नवापूर शहराच्या दिशेने येणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहन पोलिसांना संशय आल्याने थांबवले असता वाहनाची तपासणी केली.चालकास विचारपूस केलावर उडवाउडवीची उत्तरे त्याने पोलिसांना दिली त्यावर संशय आल्याने पोलिसांनी संपूर्ण वाहन तपासले असता वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा वाहतूक होत असल्याचा निदर्शनास आलं पोलिसांनी नवापूर पोलीस ठाण्यात वाहन जमा करीत त्या वाहनातून 1 लाख 20 हजार रुपयाचे 2 हजार 600 विमल पाऊच तीस हजार रुपये किमतीचे 2 हजार 500 तंबाखू पाऊच जप्त केले. सदर कारवाई काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडी व एक लाख 53 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा असा एकूण आठ लाख 59 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत झुलफेकर सय्यद, तौसिफ कदर शेख, अमित अग्रवाल सर्व रा. नवापूर यांच्याविरोधात नवापूर पोलिसात भादवि कलम 328 188 272 273 34 सह अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 26 (2 ) (4 ) 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोलीस शिपाई पंकज सूर्यवंशी,विकी वाघ,जगदीश सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.









