सारंगखेडा l प्रतिनिधी
मार्गशीर्ष महिन्यात असलेल्या एक मुखी दत्त यात्रेसाठी दत्त मंदिराचे सुशोभिकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. एक मुखी दत्ताच्या मंदिरात आतल्या बाजूने रंगरंगोटी करणे झुंबर लावणे यासह अन्य सुशोभीकरणाचे कामे पूर्णत्वास आली आहेत. कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. त्यासाठी मंदिर संस्थांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे अशी माहिती दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अंबालाल पाटील यांनी दिली.
सारंगखेडा दत्त मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहे .कोरोनाकाळात दिड वर्ष मंदिर बंद होते . या काळात मंदिराला आकर्षक रंगरंगोटी सह अनेक कामे करण्यात आले . या वेळी मंदिराच्या गाभाऱ्यांत अत्यंत मोहक असे काचेचे काम करण्यात आले . संप्तरंगात असलेले हे काम राजस्थानातील कारागिरानी राजस्थानी शैलीतील , मोगल कालीन शिल्प कलेशी साधर्म असलेले आहे . सारंगखेडा येथील अशोक नथ्थू पाटील यांच्या कडून करण्यात आले आहे . महानूभाव संप्रदायाचे उत्तर महाराष्ट्रातील भव्य दिव्य एकमुखी दत्त मंदिर आहे . यात्रोत्सव काळात डिसेंबर महिन्यात देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात .
सारंगखेडा येथील दत्त मंदिर हे सुमारे तीनशे वर्षापासूनची जुने आहे तसेच तेथे अश्व यात्राही भरत असते. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला एक मुखी दत्त मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात आली आहे. घुमटाच्या ठिक केंद्र बिंदूखाली दत्त प्रभुंची मुर्ती आहे . मंदिराच्या गाभाऱ्यांत जो तळापासून तर कळसा पर्यंतच्या भागाची रचना गोल गोल अशी गोलघुमटापर्यंत ही वास्तूशास्त्रानुसार व स्वरविज्ञानाचे ज्ञान समूजून केलेली आहे . प्रतिध्वनी निर्माण होऊन ध्वनी हा मंदिरातील गाभाऱ्यातच लुप्त पावतो . मंदिरामध्ये असलेल्या मुर्ती मध्ये व गाभाऱ्यातील उर्जेमुळे हे स्थळंही जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते .

राजस्थानी कलाकुसर
राजस्थानातून कलावंतांना बोलावून कलाकुसर करून घेण्यात आली घुमटाला काचेचे अस्तर लावण्यात आले तसेच झुंबर ही नव्याने बसविण्यात आले. चक्रधर स्वामीं , दत्त प्रभू , चक्रपाणीप्रभु , गोविंद प्रभु , श्रीकृष्णप्रभू या देवतांचे चित्र रेखाटण्यात आले. यामुळे या मंदिरामध्ये वातावरण प्रसन्न झाले आहे.
दत्त मंदिर परिसरात अन्य सुविधाही करण्यात आले आहेत त्यात पिण्याचे पाणी शौचालय अन्य सुविधांचा समावेश आहे. मंदिराचे सर्व सदस्य विश्वस्त यासाठी एकजुटीने प्रयत्न करत असतात. भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी विश्वस्तांकडे प्रयत्न केले जातात.
मंदिराची कायदा आणि सुव्यवस्था राखणे बरोबरच भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात मंदिराच्या अंतर्गत भागात सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यासाठी राजस्थानातून कारागीर बोलावण्यात आले होते त्यांनी काचेच्या कामासह अन्य सुशोभीकरण केले.
भिक्कन पाटील . सचिव, दत्त मंदिर संस्थान, सारंगखेडा .









