Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट,कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले

team by team
December 15, 2021
in Uncategorized
0
नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलातील 44 अधिकारी व 287 अमंलदार यांच्या पथकाने दि.14 डिसेंबर रोजी सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट / कोबींग / नाकाबंदी राबविली. यात इसम दारु पिवून वाहन चालविनाऱ्या 37 इसमां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोटार वाहन कायदा कलमान्वये 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यासह विविध आरोपींना अटक करण्यात आले असून. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन सलग दुसऱ्या दिवशीही ऑपरेशन ऑल आऊट , कोंबींग / नाकाबंदी करण्यात आली.मागील काळात महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन गटात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 14 डिसेंबरच्या रात्री नंदुरबार जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट / कोबींग / नाकाबंदी राबविण्यात आले होते . ऑपरेशन ऑल आऊटचा मुख्य उद्देश हा आगामी काळात साजरे होणारे सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजाकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा असा होता . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविणेबाबत नियोजन केले , ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार , फरार , पाहिजे , फेर अटक आरोपी , हिस्ट्रीशिटर्स , गँग हिस्ट्रीशिटर्स , रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले , चोरीच्या वस्तू बाळगणारे , रात्री संशयीतरीत्या फिरणारे , Drunk and Drive , कारागृहातुन सुटुन आलेले आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द् कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक यांनी सर्व उप – विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या . दि. 14 डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 44 अधिकारी व 287 अमंलदार नेमण्यात आले होते व संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील ,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्वतः करुन नाकाबंदी / कोंबींग ऑपरेशन / ऑपरेशन ऑल आऊट बाबत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते . पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी ,नंदुरबार सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर असे सर्व आप आपल्या पथकाचे नेतृत्व करून कारवाई करीत होते . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 36 इसम दारु पिवून वाहन चालवितांना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना मोटार वाहन कायदा कलमान्वये 36 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . तसेच त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया ही सुरु करण्यात आलेली आहे . चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले 11 रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले . त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले . 4 संशयीत इसमांच्या ताब्यात मिळुन आलेल्या मालमत्ते बाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरुध्द् जिल्ह्यातील विविध पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले . तसेच नंदुरबार शहर व अक्कलकुवा पोलीस ठाणे अभिलेखावरील फरार असलेल्या 4 आरोपीतांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान 25 दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे . त्यामध्ये 1 लाख 23 हजार 735 रुपये किमंतीची देशी विदेशी दारु , बियर असा मुद्देमाल व 40 हजार रुपये किमंतीची अवैध दारुची वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे . तसेच 23 जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 29 हजार 460 रु . किं . चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नवापुर शहरातील घडधड्या रेल्वे गेटजवळ महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला खाण्यास अपायकारक 1 लाख 20 हजार रुपये किमंतीचा विमल गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने 7 लाख रुपये किमंतीच्या चारचाकी वाहनासह मिळुन आल्याने 3 आरोपीतांविरुध्द नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तसेच नंदुरबार शहरात अवैधरीत्या जनावरांचे मास उघड्यावर विक्री करीत असतांना मिळुन आल्याने दोन्ही आरोपीतांकडुन 63 हजार रुपये किमंतीचे जनावरांचे मास जप्त करुन त्यांच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉन – बेलेबल वॉरंटपैकी 187 नॉन बेलेबल वॉरंट व 131 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आली . तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावर असलेले 58 हिस्ट्रीशिटर्स तपासण्यात आले आहे . तसेच नंदुरबार शहरात बस स्थानक समोर डी.एस. के.मार्केट जवळ रस्त्यावर एक इसम धारदार चाकु ( सुरा ) कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन धारदार चाकु ( सुरा ) करुन त्याचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . नंदुरबार जिल्हा हद्दीतुन 2 वर्षांसाठी हद्दपार केलेला पप्पु ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरैशी हा पोलीस अधीक्षक , नंदुरबार यांची अथवा न्यायालयाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहत्या घरी असतांना पोलीसांना पाहुन पळुन गेल्याने त्यांचे विरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील ऑपरेशन ऑल आऊट ( कोंबींग व नाकाबंदी ) योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. .

बातमी शेअर करा
Previous Post

पोलिस मुख्यालय ते जिल्हा परिषद प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्तावरील वाहतूक मार्गात एका दिवसासाठी बदल

Next Post

आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतननुसार लाभ मिळावा प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Next Post
आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतननुसार लाभ मिळावा प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतननुसार लाभ मिळावा प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add