नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस शिपाई पदाची मैदानी चाचणी परीक्षा 17 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या दिवशी नवापूर चौफुली ते टोकरतलाव मार्गावरील पोलिस मुख्यालयाचे प्रवेशद्वार ते जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्यासावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावर वरील दिवशी सकाळी पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुख्य रस्ता बंद राहील. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
या मार्गावरील पर्यायी वाहतूक नवापूर चौफुली नंदुरबार ते नवापूर- खामगावजवळील फाट्यापासून जिल्हा परिषदेच्या मागील बाजूने टोकरतलाव रस्या ाने परत त्याच मार्गाने नंदुरबारकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. या मार्गावर असलेल्या जिल्हा सत्र न्यायालय येथे न्यायालयीन कामकाजासाठी येणारे अभियोक्ता, इतर व्यक्ती तसेच शासकीय कार्यालय तसेच शासकीय कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींना कार्यालयाच्या वेळेत प्रवास करण्यास मुभा असेल. याबाबत पोलिस दलाने नियोजन केले आहे. मात्र, त्याकरीता संबंधितांनी आवश्यक तो पुरावा सादर करणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी म्हटले आहे.