नंदुरबार| प्रतिनिधी
भारतीय भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील आठवडाभर बर्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कमाल आणि किमान तापमानात तापमान कमी होऊन कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान ढगाळ राहील. शेतकरी बांधवानी पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी एवढा पुरेसा पाऊस झाल्यानंतर तसेच ४ ते ५ इंच एवढी ओल झाल्यास वाफसा आल्यानंतर खरीप पिकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. शेतकरी बांधवानी शेतात काम करताना आपल्या भागात पडणार्या विजांपासून संरक्षणासाठी आणि पूर्वसूचना मिळवण्यासाठी प्ले स्टोर मधून दामिनी ऍप डाऊनलोड करावे असे आवाहन डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राने केले आहे.