नंदुरबार | प्रतिनिधी

येथील पोलीस हवालदार सुहास वळवी तालुका पोलीस ठाणे व महिला पोलीस हवालदार रमिला सुहास वळवी यांचा मुलगा हर्षल सुहास वळवी हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक व छत्रपती चषक पणजी (गोवा) येथे ऑल इंडीया स्पर्धा दि.३ ते ५ डिसेंबर दरम्यान फॅन्सी इनलाईन स्केटींग कटेगरी यामध्ये रिले रेस यात दुसरा तसेच स्पीडमध्ये प्रथम क्रमांक व स्केटेसलॉनमध्ये तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाला. त्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, पोलीस उपअधिक्षक विश्वास वळवी, आरपीआय राजपूत, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल पवार व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी गौरव केला.









