तळोदा l प्रतिनिधी
बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे राज्यातील ३४ शिक्षकांना “राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार” देवून गौरविले जाणार आहे. सदरील पुरस्कार वितरण सोहळा जीवन गौरवच्या सहाव्या वर्धापन दिनी औरंगाबाद येथे पार पडणार आहे.अशी माहिती बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या रामदास वाघमारे व मीराताई वाघमारे यांनी दिली. सदरील पुरस्कारासाठीची नावे निवड समितीने नुकतीच जाहीर केली आहे. सदर पूरस्कारासाठीचे निकस हे शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील कार्याची नोंद घेवून निवड करण्यात आली आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीमती आशा दगडू पाडवी प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू.हायस्कूल तळोदा, ता.तळोदा जि.नंदुरबार यांना ‘राज्यस्तरीय जीवन गौरव’पुरस्काराने गौरविले जाणार आहे.प्राचार्य भाईसाहेब गो.हु.महाजन न्यू हायस्कूल तळोदा येथील शिक्षिका श्रीमती आशा दगडू पाडवी यांना नुकताच पुरस्कार जाहीर झाला.पुरस्काराबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अरुणकुमार महाजन सचीव आर.व्ही.सूर्यवंशी,एन.डी. माळी, एस.बी.कुमावत, बी.सी. पाटिल, व्ही.एस.वसावे, पी.बी.महाजन,सर्व संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक ए.एच.टवाळे, इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य शितल महाजन उपमुख्याध्यापक एन.जी.माळी, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा.अमरदिप महाजन
पर्यवेक्षक आर.सी.माळी,यु.एच.केदार,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.