म्हसावद l प्रतिनिधी:-
शहादा तालुक्यातील डोंगरगाव रोडवरील म्हाळसा नगरात चंपाषष्ठी निमित्त मार्तंड भैरवाचे मंदिर आहे . म्हाळसा मंदिर परिसरात मागील वर्षी चंपाषष्ठीला मार्तंड भैरवाची स्थापना करण्यात आली होती. वर्षपूर्ती निमित्त मंदिर समितीतर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आली सकाळी पंचामृत ने मातेची ( आई म्हाळसा )व मार्तंड भैरवाची पुजारी मार्फत आंघोळ करण्यात येऊन आरती व नैवद्य देण्यात आले सायंकाळी तळी भरण्यात येऊन भरीत भाकरीचे नैवद्य करण्यात आले .
यावेळी परिसरातील भावीक भक्त मंडळी नी भंडाऱ्याचा लाभ घेतला महिला सभासदांकडून चुलीवर स्वयंपाक करण्यात आला . शहादयातील नवीन वसाहतीत मार्तंड भैरवाचे हे एकमेव मंदिर झाल्याने भाविकात उत्साह व चैतन्याचे वातावरण होते . मार्तंड भैरवाचा दर्शनासाठी दिवसभर मंदिरात रीघ लागलेली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे, कार्याध्यक्ष विलास जावरे, उपांध्याक्ष डॉ विजय कलाल, सचिव गणेश सोनवणे , खजिनदार स्वप्नील पाटिल, सहसचिव वकिल पाटील ,सदस्य संजय प्रकाशकर ,निलेश सोनार, अजय सोनवणे ,विद्या सोनवणे, डॉ संगीता कलाल , निलेश शिंपी डॉ लक्ष्मण सोनार , प्रा बी डी मराठे, गिरीश जावरे ,भट जव्हेरी यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.