नंदूरबार l प्रतिनिधी
भारताचे संरक्षण दलप्रमुख जनरल (CDS) स्व.बिपिनजी रावत यांचे तामिळनाडू येथील कुन्नुर येथे झालेल्या अपघातात त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी मधुलिका यांच्यासह या घटनेत निधन झालेल्या सैन्यदलाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाजपा युवा मोर्चा नंदुरबार जिल्हातर्फे शहीद शिरीषकुमार चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक तथा गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, नगरसेवक आकाश चौधरी, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बागुल, अशोक चौधरी, संदीप चौधरी, अनिल चौधरी, राजेंद्रजी शर्मा, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, राहुल चौधरी, सागर चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.