नंदुरबार l प्रतिनिधी
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हयात विदेशातून आलेल्या २९ जणांपैकी १० जणांची आरटीपीसीआर व अन्य तपासणी करण्यात आली असून या दहाही जणांचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले असून अन्य १९ जणांची तपासणी करण्यात येणार आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्हयात विदेशी नागरीकांची तपासणी करण्यात येत असून विशेष लसिकरण मोहीमे राबविण्यात आली.
नंदुरबार जिल्हयात पहिल्या व दुसऱ्या लाटेत ९५१ जण कोरोनाने मृत्यूमूखी पडले. पहिल्या लाटेत चांगल्या व्यवस्थापनेमुळे कौतूक झाले. परंतू दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा वाढला.तसेच प्रशासन अपुर्ण पडले. ती चुक पुन्हा होऊ नये,यासाठी जिल्हा प्रशासनावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून दडपण असून वारंवार आकडेवारी मागवली जात आहे. नंदुरबार शहरात मंगळवारी आठ नागरीक आले. तर शहादा व जिल्हयात वेगवेगळया गावात २१ नागरीक आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्हयात विदेशातून आलेल्या नागरीकांची संख्या ही २९ असून पैकी १० जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आली आहे. तर
थायलंड, कूवैत, यु ई, रशिया, सन फ्रॅन्ची, दुबई अशा देशातून २९ नागरीक नंदुरबार जिल्हयात दाखल झाले आहेत. त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे आली असून त्या सर्व विदेशातून आलेल्यांची आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच त्यांचा अहवाल निगेटीव्ह येत नाही,तो पर्यंत त्यांना विलगीकरणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.