नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथे देवमोगरा गॅस एजन्सीला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे देवमोगरा गॅस एजन्सीचे संचालक धनंजय गावित यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नवापुर शहरात व तालुक्यात भारत गॅसची अविरत सेवा पुरवणारी एकमेव देवमोगरा गॅस एजन्सीला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जळगाव येथील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन च्या वतीने देवमोगरा गॅस एजन्सी चे संचालक धनंजय गावित यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या 25 वर्षात एजन्सीचे कार्य कौतुकास्पद राहिले आहे तसेच पुढे देखील राहील असे प्रतिपादन धनंजय गावित यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.