नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील समशेरपुर येथील आयान शुगर तर्फे ऊसाला 2350 रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत कारखान्याने 37 दिवसात दोन लाख 52 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले, अशी माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी. बडगुजर यांनी दिली.
आयन साखर कारखान्याचे गाळप 37 दिवसांपूर्वीच सुरू झाले. या कारखान्यांनी आतापर्यंत 2 लाख 52 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. काळ केलेल्या ऊसाला 2350 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे दर अदा करण्यात येत आहे. पंधरवडा नुसार पेमेंट पुढील आठवड्यापासून आता करण्यात येईल अशी माहिती यावेळी श्री.सचिन सिनगारे, आर.सी.बडगुजर यांनी दिली. कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु आहे. कारखान्यांकडे नोंद केलेल्या आणि नोंद न केलेल्या अशा सर्व उसाच्या गाळपाचे नियोजन केलेले आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस अन्यत्र न देता आयान शुगर नंदुरबार या कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.








