नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात प्रशासनातर्फे १६० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती पैकी 2 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे यात तळोदा येथील एक तर प्रकाशा ता. शहादा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या पाच रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








