Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यात सुझलॉन येथे चोरी प्रकरणी १० जणांना अटक, १ लाख ६० हजाराचा माल हस्तगत

team by team
December 9, 2021
in क्राईम
0
नंदुरबार तालुक्यात सुझलॉन येथे चोरी प्रकरणी १० जणांना अटक, १ लाख ६० हजाराचा माल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल असलेले सुझलॉनचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणुन एकुन 337 कि . ग्रॅम तांब्याची तार 1 लाख 59 हजार 600 रु . किं ची हस्तगत केली आहे . तसेच यामध्ये आता पर्यत 10 आरोपीना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार, दि.5 डिसेंबर रोजी रात्री 10 वा . पुर्वी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भोणे शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक K – 501 येथुन 1 लाख 18 हजार 125 रुपये किंमतीची 337 कि.ग्रॅ . वजनाची एकुण 225 मिटर व दि.1डिसेंबर रोजी शनिमांडळ शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक K – 418 मधुन 1 लाख 10 हजार 250 रुपये किमंतीची 210 मिटर तांब्याची केबल चोरीला गेल्याने सुझलॉन कंपनीचे सिक्युरिटी मॅनेजर तुकाराम सुकदेव झावरे यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात येथे दोन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील सर्व आरोपी अटक करुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेशीत केले . वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या बातमीदारांना सक्रीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीतांबाबत माहिती काढुन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे बाबत सुचना दिल्या . दि. 7 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , चाकळे ता.जि. नंदुरबार येथील सागर पाडवी व त्याच्या साथीदारांनी मिळुन भोणे व शनिमांडळ शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी करुन ती नवापुर व नंदुरबार शहरातील भंगार घेणाऱ्या इसमांना विकलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदर माहितीबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना माहीती दिली . मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ चाकळे येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकळे ता.जि. नंदुरबार येथे जावुन संशयीत सागर पाडवी याची माहिती काढुन त्यास ताब्यात घेवून सुझलॉन तार चोरी बाबत विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे लागला , म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने संदीप सन्या गवळे, विजय गन्सु ठाकरे, भागवत रमण पानपाटील, सन्या गन्सु ठाकरे, श्रावण भाईदास ठाकरे सर्व रा . चाकळे ता . जि . नंदुरबार यांचे मदतीने मागील 7 ते 8 दिवसातील भोणे व शनिमांडळ शिवारात असलेल्या सुझलॉन टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी केली असल्याचे सांगितले . तसेच यामध्ये सुझलॉन कंपनीचे सुरक्षारक्षक रविद्र देवीदास सोनवणे रा . चाकळे ता . जि . नंदुरबार हे देखील अंतर्भुत असुन त्यांनीच सदरची तांब्याची तार चोरी करण्यास सांगितले होते . अशी माहीती सांगितली . रविद्र देवीदास सोनवणे यांना ताब्यात घेवून त्याच्याकडेस सखोल चौकशी केली असता सदरची तांब्याची तार ही अल्ताफ मिर्झा यांच्या मध्यस्थीने नंदुरबार येथील भंगारवाला यास विकली असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यामुळे अल्ताफबेग मोहम्मद मिर्झा रा . गाझी नगर , नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तांब्याची तार हि काळ्या मशिद येथील मोहसीन भंगारवाला यास विकल्याचे समजले . भंगारवाला मोहसिन रहिमोद्दीन शेख रा . काळी मशिद जवळ नंदुरबार यास ताब्यात घेतले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला . परंतु त्यास विश्वासात घेवुन विचारना केली असता . त्याने चोरीची तांब्याची तार विकत घेतली असल्याचे कबुल केले . तसेच त्याचे कडुन काही तांब्याची तार हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले . उर्वरीत तांब्याची तार ही त्याने नवापुर येथील भांड्याचा व्यापारी यास विकल्याचे निष्पन्न झाले . त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापुर येथे जावुन भंगारचा व्यापारी भिकन रज्जाक शहा रा . अमनपार्क , नवापुर यास ताब्यात घेवून उर्वरित तांब्याच्या तारे बाबत विचारणा केली असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली . नंतर त्याला पोलीसांनी खाक्या दाखविताच त्याने त्याच्याकडेस असलेली सर्व तांब्याची तार ही पोलीसांना काढुन दिली . अशा रितीने स्थानिक गुन्हे शाखा , नंदुरबार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल असलेले सुझलॉनचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणुन एकुन 337 कि . ग्रॅम तांब्याची तार 1 लाख 59 हजार 600 रु . किं ची हस्तगत केली आहे . तसेच यामध्ये आता पर्यत 10 आरोपीना अटक केली असुन आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपिता कडुन आणखी उघडकीस येतील असे पोलीस अधिक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदरची कामगिरी मा . पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , जितेंद्र तांबोळी , पुष्पलता जाधव , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस अमंलदार अभय राजपुत , आनंदा मराठे , रामेश्वर चव्हाण , शोएब शेख , रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षकानी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post

आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेवत अधिकारी त्यांना डूबवण्याचे काम करीत आहेत: संतप्त जि. प.सदस्यांचा आरोप

Next Post
आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेवत अधिकारी त्यांना डूबवण्याचे काम करीत आहेत: संतप्त जि. प.सदस्यांचा आरोप

आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेवत अधिकारी त्यांना डूबवण्याचे काम करीत आहेत: संतप्त जि. प.सदस्यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add