नंदूरबार l प्रतिनिधी-
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने बऱ्हाणपूर • अंकलेश्वर रस्त्यावरील हॉटेल तापी परिसर समोर येथे अवैधपणे परराज्यातील विदेशी मदयाची वाहतुक करतांना कंटेनरसह 62 लाख 76 हजार 480 चा मुददेमाल जप्त केला .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार,
दि . 8 डिसेंबर रोजी कांतीलाल उमाप , आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य श्रीमती वर्मा संचालक ( अं व द ) राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , मुंबई , विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क , नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली . मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हॉटेल तापी परिसर समोर येथे पॅक बॉडी असलेला कंटेनर त्याचा परिवहन (क्रमांक GJ – 15 – AT – 6007 ) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स सदर कंटेनर मध्ये मिळुन आले . वाहनासह आरोपी मनोज कुमार मखनलाल बिश्नोई या आरोपी इसमास अटक करण्यात आली . परराज्यातील विदेशी मदयाचे एकुण 488 बॉक्स ( हरियाणा राज्य निर्मिती व विक्री साठी असलेले ) किंमत 44 लाख 76 हजार 480 रुपये , तसेच पैक बॉडी असलेला कंटेनर असा एकुण 62 लाख 76 हजार 480 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 ( अ ) ( ई ) , 80,81,83,90,98 ( 2 ) , 103 108 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 420,465,468 , 471 , अन्वये करण्यात आली . सदरची कार्यवाही श्निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक डी.एम. चकोर, हेमंत डी पाटील, हितेश जेठे , दुय्यम निरीक्षक पी.जे.मेहता, हंसराज चौधरी अविनाश पाटील आदींनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे डी.एम. चकोर करीत आहेत.








