Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

team by team
December 8, 2021
in कृषी
0

नंदुरबार l प्रतिनिधी
रब्बी हंगाम 2021 साठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

गहू पिकासाठी प्रति हेक्टरी 37 हजार 500 विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 563 रुपये प्रती हेक्टर , हरभरा पिकासाठी प्रति हेक्टरी 35 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 525 रुपये प्रती हेक्टर तर उन्हाळी भुईमूगसाठी प्रति हेक्टरी 40 हजार विमा संरक्षित असून शेतकऱ्यांना 600 रुपये प्रती हेक्टर इतका विमा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. गहुसाठी व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2021 तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च 2022 पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे.
योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे.

तसेच पीक काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्याच्या आत गारपीट, चक्रीवादळ , बिगर मोसमी पाऊस इत्यादी मुळे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी किंवा टोल फ्री क्रमांक 18001024088 वर संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय लोकअदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन

Next Post

नंदूरबार शहरात 9 ठिकाणी तर तालुक्यातील 42 गावात 9 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

Next Post
नंदूरबार शहरात 9 ठिकाणी तर तालुक्यातील 42 गावात 9 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

नंदूरबार शहरात 9 ठिकाणी तर तालुक्यातील 42 गावात 9 डिसेंबर रोजी विशेष लसीकरण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add