नंदुरबार l प्रतिनिधी
औरंगाबाद क्षेत्रासंबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या 117 व्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.
या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ए.के.धनवडे, सहाय्यक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद 431002 यांचेकडे 8 डिसेंबर 2021 पर्यंत अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. तक्रार अर्जाचा नमुना www.maharashtrapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र यांनी कळविले आहे.








