नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील दापूर येथे तलवार व चाकू बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील दापूर येथील रविदास फत्तेसिंग गावित याने त्याच्या ताब्यात एक तलवार व विकास रमेश गावित याने त्याच्या ताब्यात एक चाकू बाळगतांना आढळून आले. तसेच जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पोशि.लिनेश पाडवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय हत्यार कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेश येलवे करीत आहेत.








