नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार एन.डी.आर.एफ पुणे टिम व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जी टी पी कॉलेजच्या पटांगणात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती पूर आग ,भूकंप,या स्वरूपाच्या आपत्तीत कशी मात करायची या विषयी कर्नल प्रमोद राय यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, भिलाई पाडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नाद्रे ,लिलेश्वर खैरनार ,जितेंद्र गोसावी ,वैशाली गोसावी ,प्रतीक कदम, धीरज कदम, भूमिका भगत ,किरण गावित,पूनम पवार ,माधुरी पाटील ,शैलेंद्र पाटील ,रुपाली पगारे ,भारती पाटील आदी उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गोसावी व आभार प्रदर्शन संतोष नांद्रे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.डी.आर.एफ टीम पुणे व नवनिर्माण संस्था कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.