नंदूरबार l प्रतिनिधी
जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या हक्क असून तो त्यांना मिळालाच पाहिजे याकरिता नंदुरबार-धुळे जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने धुळे येथील कल्याण भवन शिवतीर्थ येथे आयोजित मेळाव्यात जुनी पेन्शन संघर्ष संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, नंदुरबार जिल्हा जुनी पेन्शन समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते यांना पाठिंबा पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाळ गावित, जिल्हा संघटक तानाजी नवगिरे, जिल्हा मार्गदर्शक शक्ती धनके,प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुका अध्यध्यक्ष तुकाराम अलट,कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर, तालुका संघटक सावनकुमार ठाकरे, केंद्र संघटक शंकर मेंडके, सहसंघटक बालाजी मुकनर, केंद्रसंघटक संजय जाधव,सहसंघटक कृष्णा तांबे तसेच अनिल चिकटे, उपेंद्रराज देवढे,शिवाजी कावरे, अंबादास काळे ,संतोष जगताप,सुभाष मोहिते,संदीप निवडूंगे,सूनील म्हत्रे,प्रविन गंडे,काळुराम टोपे ,उन्केश्वर हिवराळे ,भाऊसाहेब त्रिभुवन,प्रवीण सुरवसे,बालाजी वाडीकर,दादासाहेब शिदोरे आदी प्रहार शिक्षक संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी.यासाठी राज्यातील कर्मचारी संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने २२ नोव्हेंबर २०२१ पासून मुंबई आझाद मैदान येथून सुरू झालेली आणि ७ डिसेंबर २०२१ रोजी सेवाग्राम वर्धा जिल्हा येथे समाप्त होणारे संघर्ष यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झाली धुळे येथे भव्य पेन्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार-धुळे जिल्ह्यातून सुमारे दोन हजार अधिक कर्मचारी मेळाव्यास उपस्थित होते.जनजागृतीचे एक माध्यम असून या पेन्शन संघर्ष यात्रेची दखल घेऊन २००५ नंतर सेवेत आलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युइटी देण्यात यावी,अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने याची वेळीच दखल घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या अधिवेशनावर लाखो कर्मचारी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाचा पर्याय अवलंबतील असा गर्भित इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी मत मांडले आहे.या पेन्शन संघर्ष यात्रेचा समारोप विधानसभा अधिवेशनाच्यावेळी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येणार असून जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्व ९५ संघटना एकत्र येऊन तयार झालेली वज्रमुठ अशीच कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी मत व्यक्त केले आहे.कार्यक्रमासाठी नंदुरबार – धुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेचे राज्य,जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी शिक्षक बंधू-भगिनी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.