नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार आगारात १२० बसेस असुन संपाआधी आगाराला दररोज १२ लांखांचे उत्पन्न मिळत होते. गेल्या २५ दिवसांपासुन संप सुरू असल्याने जवळपास ३ कोटीचे अगाराचे नुकसान झाले आहे.आज २५ व्या दिवशी पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बायपास बस रवाना करण्यात आली.याबसमध्ये जाताना ५ तर येताना ८ प्रवासी होते.धुळ्याचे भाडे १४० रूपये असल्याने २५ दिवसानंतर नंदुरबार आगाराला मिळाले 1 हजार 820 रूपये उत्पन्न मिळाले.
गेल्या २५ दिवसांपासुन सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते .अखेर शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बायपास बस रवाना करण्यात आली. नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर आणि पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे. या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा राज्यातील सर्व एसटी कर्मचार्यांना कामावर रुजू होण्यासंदर्भातचे पत्र आगारप्रमुख आणि विभाग नियंत्रकांना पाठवले. त्यानुसार शनिवारी सकाळी नंदुरबार बस स्थानकावर मोठ्या पोलिस बंदोबस्तात पहिली बस रवाना करण्यात आली. धुळे नंदुरबार बायपास फलक असलेली (क्र.एम. एच. ३९-२० डी. ९७५०. ) बस पोलीस बंदोबस्तात धुळ्याकडे दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास रवाना करण्यात आली. या बसमध्ये नंदुरबारहुन 5 प्रवासी धुळ्यासाठी मार्गस्थ झाले.दुपारी 3 वाजेच्या सुमारास बस धुळ्याहून परतीला निघाली.तिथून 8 प्रवासी बसले.सायंकाळी 5.40 वाजेच्या सुमारास बस सुखरूप नंदूरबार आगारात पोहचली.दरम्यान या बस मध्ये फक्त चालक होता.वाहक नसल्याने बस स्थानकातच तिकीट फाडण्यात आले.२५ दिवसानंतर नंदुरबार आगाराला 1 हजार 820 रूपये उत्पन्न मिळाले. नंदुरबार आगारातील एक चालक किरण पवार यांनी कामावर रुजू होण्याची भूमिका घेतली . यावरून आगारात वादंग उभे राहिले . संप करणार्यांमध्ये फूट पडल्याचे भासवण्यासाठी हा प्रकार घडवला जात असून कोणीही याला गांभीर्याने घेऊ नये , आम्ही सर्व कर्मचारी एकजूट असून आमचा संपत चालूच राहील ; अशी प्रतिक्रिया या प्रसंगी संपकरी संघटनेच्यावतीने देण्यात आली . दरम्यान सकाळी शहर पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांनी स्वतः बसस्थानकातील स्थिती हाताळली . कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बसच्या पुढेमागे पोलिस वाहन देण्यात आले व नंदुरबार शहराच्या बाहेरील हद्दीपर्यंत सुरक्षित सोडण्यात आले . दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही पहिली बस रवाना झाली. यावेळी बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.








