नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथे आज शनीअमावस्येचे औचित्य साधत मान्यवरांच्या हस्ते “साडेसाती मुक्तीस्थान शनि तिर्थक्षेत्र शनिमांडळ” या पुस्तकाचे प्रकाशन विश्वस्त मंडळाचे सचिव संतोषआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वस्त मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील संतोष पाटील हे होते.
पत्रकार प्रदिप गरूड लिखीत पुस्तिका प्रकाशनाप्रसंगी जि.प.सदस्य देवमन पवार, माजी जि.प.सदस्य तथा शनैश्वर मंडळाचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव मोरे, रोहिदास राठोड, अध्यक्ष अरूण पाटील, कार्यकर्ते अरूण पाटील, शनिमांडळ सरपंच योगेश पाटील, तितालीचे प्रा.सी.पी.सावंत, तलवाडे सरपंच भरत राजपूत, सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील, कृष्णा राजपूत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मंडळाचे सचिव संतोष पाटील यांनी आपल्या मनोगतात शनि मंदिराच्या बांधकामास पुन्हा सुरूवात होणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना सुविधा उपलब्ध होतील, असे सांगुन त्यांनी या मंदिराच्या कामाला योगदान देण्याचे आवाहनही शनी भक्तांना केले. तर पत्रकार प्रदिप गरूड यांनी शनिमांडळ हे साडेसाती मुक्तीचे स्थान आहे. यामुळे या मंदिराला अन्यन महत्व आहे. भाविक याठिकाणी तेल-नारळाचा अभिषेक करून साडेसाती मुक्ती करून घेतात. या देवस्थानाची माहिती व्हावी, यासाठी शनीतिर्थ पुस्तक करण्यात आल्याचे त्यांनी सांगुन भाविकांनी पुस्तकाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.








