तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद रस्त्यावर समोरासमोर मोटर सायकलींचा झालेल्या भीषण अपघातात ५ जण मृत्यमुखी झाले होते . या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी अपघात स्थळी भेट दिली . यावेळी त्यांनी तीन सीट मोटारसायकल चालकांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना दिलेत .
यावेळी घटनास्थळी त्यांचा सोबत पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे उपस्थित होते . यावेळी त्यांनी अवैध वाहतूक , तीन सीट मोटारसायकल स्वार व बुलेट मोटारसायकल कर्कश आवाज यावर गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत . सुसाट व तीन सीट मोटारसायकली स्वार ही तालुक्यातील मोठी समस्या आहे . यामुळेच असे अपघात होत आहेत . असे मत त्यांनी पत्रकारांजवळ बोलतांना व्यक्त केले . तालुक्यात अठरा वर्षाखालील , विना परवाना मोटार सायकल स्वार धूम स्टाईल मोटार सायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे . यावर पोलीसांकडुन कडक कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे