नवापूर l प्रतिनिधी
विसरवाडी येथे शार्टशर्किट मुळे घराला आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्यासह जिवनावश्यक वस्तु व रोख रक्कम जळुन खाक झाले. प्रसंग लक्षात घेता घरातील लोक बाहेर पडल्याने जिवीतहानी झाली नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे गेल्या अनेक वर्षा पासून गुड्ड भाई कनोजीया हा व्यक्ती हातगाडी वर खारी,टोस,पाव विक्री चा व्यवसाय करतो तसेच आपल्या परिवारा सह विसरवाडीतील नई दिल्ली परिसरात भाड्याच्या घरात रहातो आज सकाळी 8. 30 वाजता घरा बाहेर असलेल्या विज मिटर जवळ अचानक आग लागली. काही वेळेतच आगीने रौदररूप धारण करून घरात असलेल्या इलेक्ट्रिक बोर्ड सह सर्व वायर खाली पडल्या.त्यात आग लागून घरात ठेवलेले खारी टोस पाव जिवनावश्यक वस्तू पंखे ,टि.व्हि ,कपडे,रोख रकम जळून खाक झाले. यावेळी शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात फोन केल्याने सहा, पो.नि. नितीन पाटील, हे.कॉ.राजेश येलवे, चालक राजु कोकणी,हेमंत हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विज वितरण कंपनी कार्यालयात फोन करून विज पुरवठा खंडीत करुन गावकरी च्या मदतीने पाणी मारुन आग आटोक्यात आण्यात आली अद्याप पंचनामा करण्यात आला न्हवता.









