नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार आगारातून 25 दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात पहिली बस धुळ्यासाठी रवाना झाली आहे.
नंदुरबार आगारातून 25 दिवसानंतर पोलीस बंदोबस्तात पहिली बस रवाना झाली आहे. चालक किरण पवार गेल्या 28 दिवसापासून रजेवर होते. प्रवाशांच्या सेवेसाठी व माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी कामावर रुजू झाल्याची प्रतिक्रिया देत धुळे साठी ५ प्रवाशांना घेऊन रवाना झाले आहे. आगार प्रशासन व पोलिस बंदोबस्तात नंदुरबार हुन धुळे साठी 5 प्रवाशांना घेऊन पहिली बस रवाना झाली आहे. नंदुरबार आगारात 537 कर्मचाऱ्यांपैकी आज सव्वीस कर्मचारी कामावर असल्याची माहिती आगार प्रमुख मनोज पवार यांनी दिली आहे.
२५ दिवसानंतर आज पहिली बस आगार प्रशासन व पोलीस बंदोबस्तात रवाना झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर इतर एसटी कर्मचारी लढा विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून एक बस रवाना झाली म्हणजे संप मिटला असं नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया संपातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.









