Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाभरात अवकाळी पावसामुळे ६२४ हेक्टर पीकांचे नुकसान

team by team
December 4, 2021
in कृषी
0
जिल्हाभरात अवकाळी पावसामुळे ६२४ हेक्टर पीकांचे नुकसान

नंदुरबार l प्रतिनिधी-
गेल्या दोन दिवसात पाऊस व थंडीमुळे प्रशासनातर्फे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यात जिल्हाभरात सुमारे ६२४ हेक्टर पीकांचे नुकसान झाले असून नंदुरबार तालुक्यात १५४ मेंढ्या व एक गाय अशा १५५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर पाच घरांची पडझड होवून नुकसान झाली आहे.यावर्षी तिसऱ्यांदा अवकाळी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तो हवालदिल झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत विभागाला प्राथमिक अहवाल पाठवला आहे.त्यानुसार नंदुरबार तालुक्यात ३, तळोदा तालुक्यात १ तर अक्कलकुवा तालुक्यात एक घर कोसळून नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय नंदुरबार तालुक्यात १५५ जनावरांनी थंडी व गारठ्यामुळे प्राण त्यागले आहेत. यामध्ये नळवे खुर्द-करजकुपे शिवारात २३, वडबारे ६८, होळतर्फे रनाळे शिवारात ३१, तलवाडे खुर्द १८ व अखतवाडे येथे एक अशा १९ मेंढ्या तर निंभेल शिवारात १२, रनाळे शिवारात १६ अशा १५४ मेंढ्यांचे प्राण गोठले आहेत. यामुळे मेंढपाळांना मोठा अवकाळीचा फटका बसला आहे. याशिवाय रनाळे शिवारात एका गाईचा देखील मृत्यू झाला.दरम्यान अवकाळी पावसामुळे नवापूर तालुक्यात सर्वाधिक ५०८.८० हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाली असून तळोदा तालुक्यात २.५० हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात ३८.३० हेक्टर तर शहादा तालुक्यात ७४.४० हेक्टर अशी जिल्हाभरात एकूण ६२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कांदा, कापूस, मिरची, सोयाबीन, पपई, केळी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे पांढरे सोने पावसामुळे खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कापसाला समाधानकारक दर मिळत असला तरी अवकाळीमुळे मात्र कापसाच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. त्यातच आता वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अवकाळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आता पंचनामा करुन तात्काळ भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादयात वाहतुकीचा बोजवारा;ट्रॅफिक जामने नागरिक हैराण, वाहतूक पोलीस मात्र गायब

Next Post

आमलाड शिवारात सापडलेल्या दोघ्या बछड्यांना वनविभागाने मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केले रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add