नंदूरबार l प्रतिनिधी
एखाद्या गरजूला एखाद्याने मदतीसाठी एक हात पुढे केला तर मदतीसाठी हजारो दात्यांचे हात पुढे सरसावत असतात असाच प्रकार प्रकाशा येथे घडला ऊसतोड कामगारांना मदतीचे फोटो पाहून त्यांच्या मदतीसाठी थेट अमेरीका निवासी नागरिक धावून आल्याचा प्रत्यय ऊसतोड कामगारांना आला.


मागील दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार मुसळधार पावसामुळे ऊसतोड कामगारांचे राहण्याचे तंबूमध्ये असलेले सर्व संसारोपयोगी साहित्य अन्नधान्य यांचे प्रचंड नुकसान झाले.कामगार बेघर व उपासमार होऊ नये यासाठी प्रकाशा गावातील जागरूक नागरिक मंचतर्फे ऊसतोड कामगारांना पहिल्या दिवशी १८ जणांना शिधा वाटप केली.याबाबतची माहिती मिळताच
प्रकाशा मुळ वतनी स्व.शा. ओंकारलाल हिराचंद वाणी परिवार,नंदूरबार यांच्यातर्फे अमेरीका निवासी कांतीलाल मगनलाल वाणी यांनी गावातील समाजबांधवांनी संपर्क करीत गरजूंना 70 सोलापूरी चादर वाटप उपलब्ध करून दिल्या. जागरूक नागरिक मंच यांच्यातर्फे चादरी वाटप करण्यात आल्या. तसेच जागरूक नागरिक मंचने आज एकूण 45 कुटुंबांना रेशन किट वाटप करीत या कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. यावेळी मंचाचे उपाध्यक्ष वामन मराठे,मुकेश पाटील,पावभा गुरव,हितेश वाणी,अक्षय भावसार,राजेंद्र वाणी,स्वप्निल कुलकर्णी,पंकज भिल,जितेंद्र ठाकरे,प्रकाश भोई,विजय वाणी,धीरज मोरे,धीरज वाणी,महेंद्र साळी,छोटू वाणी,अनिल गुरव,हिमांशू तांबोळी व प्रकाशा गावातील पोलीस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी नियोजन केले.









