नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष तथा नंदुरबार जि.प.सदस्य भरत गावित यांनी दांपत्यासह सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल यांची विधानपरिषद सदस्यपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.आ.अमरीशभाई पटेल यांची भाजपा तालुकाध्यक्ष तथा नंदुरबार जि.प.सदस्य भरत गावित व नंदुरबार भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ. संगीताताई गावित यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी नवापुर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक गिरिष (नंदुभाऊ ) गावित, नगरसेवक महेंद्र दुसाने, नगरसेवक बंटी चंदलानी ,माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे , नगरसेविका मंगला सैन, सामाजिक कार्यकर्ते विजय सैन, हेमंत जाधव, जैनू गावित आदी उपस्थित होते.








