नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे हे नंदुरबार तालुक्यातील पिंप्री ग्रामपंचायत येथे आरोग्य सेवा सुविधा पाहणी अंतर्गत गावातील सामाजिक, भौगोलिक राहणीमान दर्जा, उपजिविका, रोजगार, शैक्षणिक स्थिती, आर्थिक परिस्थिती, दळण वळणाची सुविधा, आरोग्य सेवासुविधा, आरोग्य समस्या, गावातीलव्यसनाधीनता, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी याच्या अध्ययनासाठी गावातील १०० कुटुंब प्रमुखांना भेटून, गावकऱ्यांशी चर्चा करून गावाच्या परिस्थितीचे अभ्यास करीत आहेत .
या इंटर्नशिप साठी टाटा इन्स्टिट्यूट मार्फत नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार येथे त्यांचे कार्य सुरु आहे डॉ.समताज्योती बाळकृष्ण तायडे हे येथील प्रा. बाळकृष्ण तायडे यांच्या कन्या असून उच्च शिक्षण घेऊन सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोसीअल सायंस, मुंबई येथे डॉक्टर पदवी घेतल्या नंतर पदवीत्तर पदवी साठी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सोसीअल एपिडेमिओलोजी) अभ्यास क्रमातील भाग म्हणुन क्षेत्रीय भेट अंतर्गत पिंप्री ग्रामपंचायत मधील अभ्यास केल्यावर संशोधन अहवाल सादर करणार आहेत .डॉ समताज्योती तायडे यांना अनेक मोठ्या शहरातील मोठ्या संस्था मध्ये इंटर्नशिप साठी संधी असताना त्यांनी नंदुरबार येथेच इंटर्नशिपसाठी आवड दाखीविली तसेच भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रात नंदुरबार शहरातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली तरी या कार्यासाठी त्यांना टाटा इंन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ.शंकर दास इंटर्नशिप समन्वयक ,डॉ.नरेद्र काकडे डॉ. एम.सिवकामी डॉ.निलेश गावडे यांनी सहकार्य केले .








